जळगाव । जिल्ह्यात ९ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले. त्यांना तात्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपुर्वी जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश निघाल्याने जळगावात नवीन अधिकारी आले होते. परंतु पदस्थापना न झाल्याने त्यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी नियंत्रण कक्षासह पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून नियुक्ती दिलेल्या ९ पोलीस निरीक्षकांच्या बदलचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले.
नियंत्रण कक्षाचे विशाल जयस्वाल यांची जिल्हापेठ पोलिस ठाणे निरीक्षकपदी, तर जिल्हापेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ प्रभारी म्हणून नियुक्ती झाली.
नियंत्रण कक्षाचे बबन जगताप यांची सायबर पोलिस ठाणे निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे सुनील पवार यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलिस निरीक्षकपदी, विलास शेंडे यांची जिविशा शाखेत निरीक्षकपदी, जिविशा शाखेचे रंगनाथ धारबळे यांची शनिपेठ पोलिस ठाणे निरीक्षकपदी, सहाय्यक निरीक्षक रूपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post