जळगाव । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीय. यात शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे टास्क स्वीकारून जादा नफा कमावण्याच्या मोहात पडल्याने फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशातच जळगाव येथील आदर्शनगरात राहणाऱ्या नोकरदाराने १३ लाखांत तर जामनेर तालुक्यातील व्यापाऱ्याने ७ लाखांत फसवणूक झाल्याबद्दल सायबर पोलिसांत तक्रार दिली.
आदर्श नगरातील योगेश वसंत हेबाळकर (वय ५४) या खासगी नोकरदाराला १८ डिसेंबर २०२३ ते ७ मार्च २०२४ दरम्यान संशयित गायत्री देवी, बिश्नू शहा या दोघांनी अक्षय इन्स्टिट्यूशन नावाने व्हॉट्सअॅपवर ४४७४९५३९८८६५, ४४७४१५३१८८५८, १९८४५१९०९२०० या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. नंतर जादा नफा कमावण्याचे आमिष दाखवत १२ लाख ६७ हजार ५०० रुपये शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवायला सांगून फसवणूक केली, तर पिंपळगाव (ता. जामनेर) येथील विजय शेषराव भोई या व्यापाऱ्याची २७ मार्च २०२४ ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान अवघ्या ९ दिवसांत ७ लाख रुपयांची फसवणूक इसली आहे.
त्यांना अनक्षा आचार्य असे नाव सांगणाऱ्या व्हॉट्सअॅप क्रमांक ९८६०५६२५०२ वरील व्यक्तीने तसेच ९१९६६८६५८०१२ या क्रमांकावरून लिंक पाठवून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार विजय भोई यांनी एचडीएफसी व एसबीआय या बँकेच्या खात्यातून ७ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तक्रार दिली. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत. दरम्यान, आतापर्यंत सात जणांची अशाच प्रकारे दोन कोटी रुपयांत फसवणूक झालेली आहे















Discussion about this post