यावल । मुलाने जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याने यावल तालुका हादरला आहे.
यावल तालुक्यातील रिधुरी गावात सोमवारी रात्री ८.३० वाजता घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे (वय ५०) यांच्या डोक्यात कुर्हाडीने वार करण्यात आले. यात धनराज सोनवणे जागीच ठार झाले. तर याच हाणामारीत सतीश सुखदेव सोनवणे (वय ३०), आरती सतीश सोनवणे (वय २८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या संदर्भात सोनी धनराज सोनवणे (वय ३५ रा. रिधुरी ) यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे व दीपक युवराज सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ हे करत आहेत.















Discussion about this post