न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. NPCIL मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू झाली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३३० उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) (ii) GATE 2024/2025/2026
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय ३० एप्रिल २०२६ रोजीच्या तारखेनुसार मोजले जाईल. कमाल वयोमर्यादा २६ वर्षे आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची, तर एससी आणि एसटी उमेदवारांना पाच वर्षांची सवलत मिळेल
पगार: निवड झालेल्या उमेदवारांना ₹५६,१०० मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया कशी पार पडेल?
उमेदवारांची निवड ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) 2024/2025/2026 मधील त्यांच्या गुणांच्या आधारे केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अर्ज कसा करावा
नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम www.npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या होमपेजवरील ‘Apply’ सेक्शनवर क्लिक करा.
या प्रक्रियेनंतर, NPCIL एक्झिक्युटिव्ह ट्रेनी रिक्रूटमेंट 2026 या लिंकवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
अर्ज पूर्ण केल्यानंतर, नोंदणी शुल्क भरा.
शेवटी, भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रिंटआउट घ्या.
नोंदणी शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹500 नोंदणी शुल्क भरावे लागेल. महिला आणि दिव्यांग उमेदवारांना नोंदणी शुल्कातून सूट आहे.















Discussion about this post