सरकारी क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या अभियंत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून एकूण 114 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भरती अंतर्गत असिस्टंट इंजिनिअर – RE (Asset Management/Operation & Maintenance) पदाच्या 100 जागा, तर डेप्युटी जनरल मॅनेजर – RE पदाच्या 14 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
असिस्टंट इंजिनिअर – RE:
उमेदवाराने इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर – RE:
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल किंवा मेकॅनिकल शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य राहील.) तसेच 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा
31 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार,
असिस्टंट इंजिनिअर पदासाठी कमाल 40 वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी कमाल 44 वर्षे
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील.
अर्ज शुल्क
General / OBC / EWS: ₹500
SC / ST / PwD / Ex-Servicemen / महिला उमेदवार: शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात केली जाणार आहे.
अर्जाची अंतिम मुदत
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post