मुंबई । आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये शॉर्ट टर्म कोर्स सुरु होणार असून याबाबत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे.दरम्यान, पंतप्रधान मोदी पहिल्या तुकडीचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करणार आहे.
४१९ आयटीआय आणि ४१ पॉलिटेक्निकमध्ये २५०६ तुकड्या सुरु होणार आहे.दरम्यान, याअंतर्गत दरवर्षी ७५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. याचसोबत कुंभमेळ्यासाठी वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट ट्रेडच्याहीदोन तुकड्या असणार आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि एआयचे प्रशिक्षण मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावे, यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी आवाहन केले आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, तरुणांना अल्प कालावधीत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, युवांना कौशल्याधिष्ठित स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी महिला उमेदवार व ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर कौशल्य प्रशिक्षणाची उपलब्धता करून देणे. आधुनिक तंत्रज्ञानातील नवीन व्यवसायांमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
खासियत काय?
– महिलांसाठी तब्बल ३६४ स्वतंत्र तुकड्या असतील
– इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, एआय, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४०८ तुकड्या सुरु होतील
– आगामी कुंभमेळ्यासाठी “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” ट्रेडच्या दोन तुकड्या असतील
– गडचिरोली आयटीआय मध्ये ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिकचा व्यवसाय अभ्यासक्रम
– हरंगुल लातूर येथील संवेदना दिव्यांग खासगी आयटीआय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गृह उपकरणे, टॅली आणि फॅशन तंत्रज्ञानाचे विशेष अभ्यासक्रम
– वाढवण बंदरासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर उपलब्ध करून देणारे प्रशिक्षण
– ग्रीन हायड्रोजन प्रॉडक्शन व्यवसायाकरिता आठ तुकड्या, तर आयटीआय दादर (मुलींची) येथे सेमीकंडक्टर टेक्निशियन व्यवसाय सुरू होणार
– महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर, गोंवडी आयटीआय येथे व शासकीय टेक्निकल हायस्कूल अमरावती व नागपूर येथे ॲडव्हान्स वेल्डिंग, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड ॲडव्हान्स सीएनसी, इंटरनेट ऑफ थींग्ज हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.















Discussion about this post