मुंबई । भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावर यांच्या मुलाने शरद पवार गटाची साथ सोडली. आतिश दांडेगावकर यांनी १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. नवी मुंबईमध्ये त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी नवी मुंबईत हिंगोलीवरून ४५० ते ५०० गाड्यांचा ताफा आला होता. या पक्ष प्रवेशामुळे हिंगोलीमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हिंगोलीचे नेते आणि माजी मंत्री जय प्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आतिश दांडेगावकर यांच्यासह १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
४५० ते ५०० गाड्यांचा ताफा नवी मुंबई शहरामध्ये आतिश दांडेगावकरांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवत भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. ‘हिंगोली जिल्ह्यांमध्ये विकासाची गरज आहे या दृष्टीने भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भाजपात पक्ष प्रवेश करण्याची इच्छा होती.’, असे आतिश दांडेगावकर यांनी सांगितले.















Discussion about this post