जळगाव । नशिराबाद उड्डाणपुलावर सोमवार 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडर जोरदार धडकली. या अपघातात जुळ्या भावांपैकी चैतन्य सुपडू फेगडे (26, रा.निंभोरा, ता.रावेर) याचा मृत्यू झाला
रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील रहिवासी चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. घरकुल योजने संदर्भातची फाईलच्या कामानिमित्ताने चैतन्य हा जुडवा भाऊ चेतन व वडील यांच्यासोबत सोमवार, 31 मार्च रोजी जळगाव जाण्यासाठी निघाले. चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ईई 1702) ने भुसावळकडून जळगावकडे येत असताना नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडर जोरदार धडकली. या अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला.
Discussion about this post