नाशिक । राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. यातच भाजपकडून देखील ऑपरेशन लोटस सुरू आहे. आपली ताकद वाढण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असताना मात्र नाशिकमध्ये ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. नाशिकमध्ये भाजपचे दोन दिग्गज नेते शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे. बड्या नेत्यांनी साथ सोडल्यामुळे हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड सोमवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले हे इनकमिंग शिवसेना ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली होती. मात्र पहिल्यांदाच पक्षात इनकमिंग होत असल्याने पक्ष मजबुतीसाठी फायदा होणार आहे. पण संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड यांच्या या निर्णयामुळे भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यापाठोपाठ अनेक जण ठाकरे गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post