नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँकत भरती जाहीर केली आहे.यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून नाबार्डमध्ये ग्रेड ए पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.nabard.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत
काय आहे पात्रता :
नाबार्डमधील भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.याचसोबत ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ एमबीए/पीजीडीएम/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
नाबार्डमधील भरती मोहिमेत एकूण ९१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या असिस्टंट मॅनेजर ग्रॅड ए साठी ८ जागा रिक्त आहेत.असिस्टेंट मैनेजर Grade ‘A’ पदासाठी २ जागा रिक्त आहेत.असिस्टेंट मॅनेजर Grade ‘A’ (Protocol & Security Service) 4 पदे भरती केली जाणार आहे.
या भरती मोहिमेत अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरायचे आहेत.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला nabard.org या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Career Notices वर क्लिक करायचे आहे.
यानंतर Apply Here वर क्लिक करा.
यानंतर Click here for New Registration वर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर तुमची माहिती, सही आणि फोटो टाकायचा आहे.
यानंतर अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post