राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ने सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ती ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार निर्धारित वेळेत नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट www.nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.
नाबार्डमधील या नोकरीसाठी एकूण ९२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए (रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस)मध्ये ८५ पदांसाठी भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर लीगल सर्व्हिस २ जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिस) पदासाठी ४ जागा रिक्त आहेत.
असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए, सीए पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
नाबार्डमधील नोकरीसाठी ibpsreg.ibps.in/nbardamoct25/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
सर्वात आधी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे.
यानंतर तुम्हाला माहिती, सही आणि फोटो अपलोड करायचा आहे.
यानंतर फॉर्म भरुन सबमिट करायचे आहे.















Discussion about this post