मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी होणार भरती?
एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सिक्युरिटी ऑफिसर, वेल्फेअर ऑफिसर, सिनिअर वेल्फेअर ऑफिसर, डेप्युटी अॅडमिनिस्ट्रेटर (वेल्फेअर), हिंदी ऑफिसर, हिंदी ट्रान्सलेटर ग्रेड-2 या जागा भरण्यात येणार आहेत.
भरतीसाठी पात्रता :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.
सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाारांचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे. वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उपव्यवस्थापक ((वेल्फेअर) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षांदरम्यान असावे.
मिळणार इतका पगार :
यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. हिंदी अनुवादक ग्रेड-II पदासाठी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार ते 891 लाख 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 6 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा















Discussion about this post