मुंबई । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरु असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुंबई महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावीच लागणार आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून अडीच वर्षांच्या महापौर पदासाठी भाजपकडे हट्ट धरला होता. त्यातच आता ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आले. भाजपला सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गटाचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबई आणि राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
भाजप मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करत असल्यास, ठाकरे गट भाजपच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक मतदान प्रक्रियेत अनुपस्थित राहणार असल्याचे सूत्रांची सांगितले.















Discussion about this post