महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आयोगातर्फे ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षकसह सहायक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक या पदांसाठी एकूण ५५२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी सर्वाधिक ३१० पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या ठिकाणी अर्ज प्रक्रिया, परीक्षा शुल्क, परीक्षा पॅटर्न आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
असा आहे पदांचा तपशील
सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) – ०६
राज्य कर निरीक्षक (एसटीआय) – २३६
पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) – ३१०
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अनिवार्य. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवारही तात्पुरते पात्र आहे; मात्र मुख्य परीक्षेपर्यंत पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पीएसआयसाठी येत्या १ ऑगस्टपासून किमान १९, कमाल ३१ (खुला) व ३४ (मागासवर्गीय). एएसओ व एसटीआयसाठी किमान १८, कमाल ३८ (खुला) व ४३ (मागासवर्गीय).
परीक्षा शुल्क : खुल्यासाठी : ३९४ रुपये,
मागासवर्गीय/आर्थिक ांसाठी २९४ रुपये. दुर्बल/अनाथ/दिव्यांग
शारीरिक पात्रता : केवळ पीएसआय पदासाठी पुरुष उंची किमान १६५ सेंमी, छाती ७९ सेंमी (न फुगवता) व ५ सेंमी फुगवण्याची क्षमता. महिलांना उंची किमान १५७ सेमी.
कागदपत्राची यादी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी २०२५-२६ किंवा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.















Discussion about this post