राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबईतील वाहतुक पोलिसांच्या वसुलीचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला. ज्यात त्यांनी पोलिसांना प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. मुंबईमधील वाहतूक पोलिसांना प्रत्येक चौकात २५ हजारांची वसूली आणि २० वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे.
दरम्यान, याबाबत ट्वीट करत खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे की, “आजचा धक्कादायक अनुभव!… मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले.
आजचा धक्कादायक अनुभव-
मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!… pic.twitter.com/TJ3oq2oSsO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 2, 2023
तो मेसेज पाहून मला धक्काच बसला. मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000 प्रति दिन म्हणजे, फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये जमा होतात. इतर शहरांचं काय?… त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी आणि अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास, वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल. शेवटी ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली” असा टोलाही कोल्हे यांनी लगावला.
Discussion about this post