जळगाव । एमआयडीसीतील लोकमत कार्यालयाजवळून दुचाकी आणि मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमनाथ भावगत अहिरे रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे चोरट्याचे नाव आहे.
याबाबत असे की, तालुक्यातील चिंचोली येथे राहणारे ईश्वर सुभाष घुगे वय 44 हे हात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते 14 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धार्मिक कार्यक्रम आटोपून त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच 19 सीबी 41 14 ने घरी जात असताना असताना त्यांना रेमंड चौफुली पुढे अचानक चक्कर आल्याने त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून ते तिथेच झोपून गेल्याने त्यांची दुचाकी व मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दुचाकी चोरी ही कुसुंबा येथील रहिवासी सोमनाथ भागवत अहिरे याने केल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना पाठवून खात्री करण्यास पाठवले असता काशिनाथ लॉज चौकात आरोपी मिळून आला. सोमनाथ अहिरे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने दुचाकी आणि मोबाईल असा एकूण वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली.त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.















Discussion about this post