नाशिक । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली असून एका तरुणाने भुजबळ यांना धमकीचे सलग १२ मॅसेज पाठवले. याबाबत छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सौदागर सातनाक, असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांनी भुजबळ यांच्या निवास्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. इतकंच नाही, तर भुजबळ यांच्या ताफ्यातील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा एका तरुणाने छगन भुजबळ यांना धमकी दिली.
फोनवर एकापाठोपाठ एक असे १२ मॅसेज पाठवत या व्यक्तीने भुजबळ यांना धमकी दिली. या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील छावणी छावणी पोलिस ठाण्यात भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.















Discussion about this post