भडगाव । भडगाव येथे पारोळा चौफुलीवरील एका चहाच्या हॉटेलमध्ये अचानक फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन हॉटेल मालकासह १३ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पाचोरा, जळगाव आणि धुळे येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चहा पिण्यासाठी ग्राहकांची रविवारी दुपारनंतर गर्दी झाली होती. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला
याठिकाणी किमान १२ ते १३ लोक चहा पिण्यासाठी थांबलेले होते. ते सर्वजण या स्फोटात जखमी झाले आहेत. आवाज होताच सर्वजण घाबरून बाहेर पळाले; पण यातील अनेकजण गंभीर आहेत. जखमींना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पाचोरा, जळगाव व धुळे येथील खासगी व शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली. रुग्णवाहिका चालक निळू पाटील, भैया पाटील, सागर पाटील व गोलू शिंदे यांनी जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल केले.
जखमींचे नाव :
हॉटेलचालक शेख रफिक शेख रज्जाक (५०), त्यांचा मुलगा सोहिल शेख रफिक मणियार (२८, दोघे रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव), ग. स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष रवींद्र मुकुंदराव सोनवणे (५६, रा. बाळद रोड, भडगाव), इकबाल शेख गनी (४०, रा. गंजी वाडा, भडगाव), एजाजोद्दीन रियाजद्दीन मुल्ला (३२, रा. जलाली मोहल्ला, भडगाव), मोहसीन शेख शब्बीर (३३, रा. ग्रीन पार्क कॉलनी), दिलीप भटा ठाकरे (६०, रा. साईनगर, भडगाव), भूषण प्रकाश पाटील (३४, रा. जुवार्डी, ता. भडगाव), राजकुमार मोतीराम पवार (२८, रा. बिदर, कर्नाटक), मयूर पदमसिंग पाटील (२८, वडधे, ता. भडगाव), राहुल बापू पाटील (४०, रा. जामदे, ता. चाळीसगाव), अमोल गोविंद शिंदे (३४, रा. वळूज, जि. सातारा) आणि गजानन दिगंबर उजेड (२८, रा. वडगाव, ता. जालना) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.















Discussion about this post