नाशिक । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावलीय.
30 वर्षांपूर्वी म्हणजेच 1995 साली हे प्रकरण समोर आलं होतं. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालया माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध निकाल दिला आहे.
भादंवि 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच नाशिक जिल्हा कोर्टाकडून दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार का? आमदारकी जाणार का? कायदा काय सांगतो? याची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास आमदार अथवा खासदारकी रद्द होते. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी जाणार का? अशी चर्चा सुरू झाली.
Discussion about this post