कोलकातामधील डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जात असून याच दरम्यान महिला सुरक्षेबाबत पश्चिम बंगालमधील ममता सरकार एक मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ७ दिवसातच फाशी होण्याबाबतचे नवीन विधेयक आणले जाणार आहे.
कोलकातामधील ट्रेनी डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेवरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या घटनेमध्ये कारवाईत दिरंगाई केल्याने ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे तसेच भाजपच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे, अशातच ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली असून महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे विधायक आणले जाणार असल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
भाजपच्या राज्यव्यापी बंद दरम्यान बोलताना ममता बॅनर्जी यांनी सरकार पुढील आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवणार आहे. यामध्ये 10 दिवसांच्या आत बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी विधेयक मंजूर केले जाईल. आम्ही हे विधेयक राज्यपालांकडे पाठवू. तो मंजूर न केल्यास राजभवनाबाहेर आंदोलन करू. हे विधेयक मंजूर झालेच पाहिजे आणि यावेळी ते जबाबदारीतून सुटू शकत नाही, असे म्हणत नवा कायदा आणण्याची घोषणा केली आहे.















Discussion about this post