मुंबई । बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली असून अभिनेत्री मलायका आरोरा हिच्या वडिलांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मलायका आरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील इमारतीच्या टेरीसवरुन उडी घेत आत्महत्या केली. आरोरा कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अनिल आरोरा यांनी टोकाचं पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
कधी घडली घटना ?
या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत आहे.
वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या टेरिसवरुन अनिल अरोरा यांनी उडी घेत आयुष्य संपवल्याचं समोर आलेय. अनिल आरोरा यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिसांनी अनिल अरोरा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिस याप्रकऱणाचा कसून तपास करत आहेत.
Discussion about this post