तुम्हीही सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
महिला व बालविकास विभागात अध्यक्ष आणि सदस्य अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आणि संरक्षण आयोगावर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.
अध्यक्ष पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बालकांच्या कल्याण व विकासाशी निगडीत काम केलेले असावे. सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने याआधी दोन वेळा अध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम केलेले असावे. एकूण ७ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. ()
महिला व बालविकास विभागातील या भरतीची माहिती https://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज आयुक्त कार्यालय,महिला व बालविकास आयुक्तालय, २८ राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य- पुणे १ येथे पाठवायचा आहे.















Discussion about this post