महायुतीच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले असून महायुतीमधील तिन्ही पक्षांत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे. परंतु अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले. त्यासाठी राज्याचे तीन प्रमुख नेते दिल्ली जात आहेत. त्यामुळे काहीतरी महत्त्वाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर होणार आहे. त्या अधिवेशापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. तुम्हाला मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, माझ्या फार काही अपेक्षा नाहीत. मंत्रिपदाबाबत शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील.
कुणी काय निर्णय घ्यायचा हा संपूर्ण अधिकार या तिन्ही प्रमुख नेत्यांना आहे. त्यात कुणाचाही काही चालणार नाही. भाजप आमदारांची सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे संभ्रम कुठलाही नाही. त्यांना अधिक संधी मिळावी, ही अपेक्षा प्रत्येकाची आहे. निर्णय घेताना थोडीशी कसरत निश्चित होत आहे. पण आता कुठलाही घोळ नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post