Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या ‘अ‍ॅक्वाफेस्ट’ जल पर्यटन महोत्सवाला सुरुवात

मेहरूण तलावात होणार कायम स्वरूपी जलपर्यटन; पर्यटन मंत्री महाजनांनी केली 15 कोटीची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 2, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या ‘अ‍ॅक्वाफेस्ट’ जल पर्यटन महोत्सवाला सुरुवात
बातमी शेअर करा..!

जळगाव । पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. महाराष्ट्रातील पहिला तीन दिवशीय “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सवाचे जळगावमध्ये मेहरूण तलावात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन झाले.त्या प्रसंगी ते बोलत होते.

जळगावकरांसाठी कायम स्वरूपी जल पर्यटन केंद्र
जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याला लागून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळ आहेत. जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकसित केली जात असून आज पाण्यातला हा बोटींचा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरूण तलावात हे जल पर्यटन प्रकल्प कायम स्वरूपासाठी राबविणार असून यासाठी 15 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरु केले जाईल अशी घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधी मेहरूण तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.फक्त जळगावकरांसाठीच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही हे आकर्षण केंद्र ठरेल असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

राज्यातील पर्यटन विकासासाठी पर्यटन धोरण
आपल्या राज्याला 750 किलोमीटर एवढी मोठी समुद्र किनारपट्टी आहे. इथल्या पर्यटनात मोठी क्षमता असून जगभराचे पर्यटक याठिकाणी आकर्षित होतील यासाठी सिंधुदुर्गच्या जवळ स्कुबा डायव्हिंगचा प्रकल्प सुरु केला आहे. समुद्राच्या आत मध्ये जाऊन तिथलं जैविक वैभव ज्यात सर्व प्रकारचे जलचर प्राणी, मासे, वनस्पती पाहायला मिळतील. आज पर्यंत इथे परदेशी पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल नव्हते ते आता हॉटेल ताजच्या रूपात पहिल्या हॉटेलच्या पायाभरणीचा शुभारंभ होणार असल्याचेही पर्यटन मंत्री यांनी सांगितले. तसेच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नसेल अशी डेक्कन ओडिसा सुरु करणार असून यात 24 तास राहण्यासाठीच्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यटन मंत्र्यांनी स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव
अॅक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सवाची फीत कापून पहिल्यांदा बोटीतून खासदार, आमदार यांच्यासह जल पर्यटनाचा आनंद घेतला. बोट मध्यभागी गेल्यानंतर या बोटीतून स्पीड बोटीवर स्वार होऊन स्वतः हातात स्टेअरिंग हातात घेवून ताशी 90 किलोमीटर वेग असलेल्या बोटीचा थरार अनुभवला. मेहरूण तलावाला तीन फेऱ्या मारून स्वतः बरोबर बघणाऱ्यांनाही पर्यटन मंत्र्यांनी आनंद दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आता ’आनंदाचा शिधा’ दसरा, दिवाळीत तरी मिळणार का? रेशनकार्डधारक चिंतेत

Next Post

नवीन मका बाजारात दाखल होताच घरसरला; आता इतका मिळतोय दर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ‘या’ आहेत उपाययोजना

नवीन मका बाजारात दाखल होताच घरसरला; आता इतका मिळतोय दर?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

March 12, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

March 12, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page