मुंबई । लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणूक कधी लागणार याकडे सर्वच पक्षांची नजर असून अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने ४ राज्यांमधील निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना केली जारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चबांधणी सुरु केली असून जागावाटपावरून खलबंत सुरू आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागले आहे. यासाठी आज मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
घरोघरी जाऊन मतदार याद्या अदययावत करा, अशा सूचना आयोगाने निवडणूक दिल्या आहेत. तसेच मतदान केंद्राच्या अडचणी देखील दूर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्याआधीच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरी अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक घेण्यासाठी बराच वेळ मिळेल. पण हरियाणा विधानसभेची मुदत आधी संपत असल्यामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घेतली जाऊ शकते. २०१९ साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास मतदान होऊ शकते.
Discussion about this post