मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानामध्ये सतत चढ- उतार पाहायला मिळत असून कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच राज्यावर आजही अवकाळीचे संकट कायम आहे. आजही हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ऊन्हाचे कडक चटके बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचे असणार आहेत. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील अवकाळीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहिल आणि उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.
Discussion about this post