महाराष्ट्रात तापमान वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशावर गेला आहे. यामुळे वाढता उकडा आणि उष्णतेच्या झळा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये हवामान खात्याने तापमानाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितले की, यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा लागणार आहेत. महाराष्ट्र तापणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. राज्यात पुढील काही दिवस उष्ण तापमान असणार आहे. सोलापूरमध्ये जास्त तापमान ३९° सेल्सिअसची नोंद झाली आहे. हे तापमान प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे.
पुढील दोन दिवसांत तापमान कमी होईल पण नंतर ते वाढणार आहे. सध्या राज्यात पाऊस कुठे होईल असा अंदाज नाही. एक दोन राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल आणि मे मध्ये जास्त तापमान राहिल. तापमान सरासरीपेक्षा जास्त असते. या काळामध्ये ४ पेक्षा जास्त उष्ण लहरी आसण्याच्या शक्यता आहे. पुण्यातील लोहगाव, चिंचवड, कोरेगाव पार्क, मगरपट्टा या भागात जास्त तापमान असणार आहे.
राज्यातील सर्वधिक तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. सोलापूर शहरातील तापमान ३९.४ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. सोलापूरमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतोय. तापमानात नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन उष्माघात कृती आराखडा राबवणार आहे. दुपारच्या सत्रात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post