मुंबई : देशात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेची बाब आहे. यातच राष्ट्रात झाला आहे.महाराष्ट्रातील नागरिकांच्या आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या वर्षभरातील देशातील आकडेवारी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाली आहे. वर्षभरात राज्यात सर्वाधिक म्हणजेच २२,७४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १९,८३४ आत्महत्यांची नोंद झाली आहे.
कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे १९४१ जणांनी आत्महत्या केली आहे.
त्यानंतर कर्नाटकात १,३३५ आणि आंध्र प्रदेशात ८१५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालातून राज्यातील लाजिरवाणी आकडेवारी समोर आली आहे.
तर राज्यात बेरोजगारीमुळे ६४२, गरिबीमुळे ४०२ आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे ६४० नागरिकांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास ६,९६१ आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी ४९.३ टक्के आत्महत्या आहेत.















Discussion about this post