महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती संदर्भातील जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्द झाली आहे.
या पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेनुसार ‘जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, विधि सहायक’ पदांची भरती करण्यात येणार आहे.
या पदभरती अंतर्गत एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
जिल्हा वक्फ अधिकारी : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
कनिष्ठ लिपिक : 01) सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी. 02) मराठी टंकलेखनाचे किमान शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक : 01) किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 02) 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
कनिष्ठ अभियंता : 01) सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी 02) 02 वर्षाचा व्यावहारिक अनुभव.
विधि सहायक : 01) सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी 02) 03 वर्षे अनुभव.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
संकेतस्थळ : www.mahawakf.com
Discussion about this post