मुंबई : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता सहकारी संस्था विशेषत: बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार होता. मात्र, सहकार खात्याने आणखी एकदा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. , आधी लोकसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता, पावसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आता पावसाचा हंगाम संपेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 प्रर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्य सरकारने यापूर्वी सुमारे 38 हजार 740 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना31 मेपर्यंत स्थगिती दिली होती.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
यंदाच्या 2024 या वर्षात 7 हजार 827 सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सर्व 38 हजार 740 सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे. मात्र, आधी लोकसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता, पावसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. शेतीची पेरणी आणि पावसाचं कारण दाखवत सरकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पावसाचा हंगाम संपेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 प्रर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.















Discussion about this post