पुणे । पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील ४८ तासांत विदर्भातील यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, अमरावती अकोला जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पासून पुढील १६ तारखेपर्यंत या जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.















Discussion about this post