पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया आज, म्हणजेच 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या भरतीमध्ये शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ या विविध पदांचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर्षी उमेदवारांसाठी एक विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, सन 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत संधी देण्यात येणार आहे.
पोलिसांची रिक्तपदे
पोलिस शिपाई : 12,399
चालक शिपाई : 234
सशस्त्र पोलिस शिपाई :2,393
कारागृह शिपाई : 580
बॅण्डसमन : 25
एकूण : 15,631
कुठे कराल अर्ज?
मागील वर्षी राज्यात 18 हजारांहून अधिक पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती. यंदाही 15 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजेच पूर्ण एक महिना सुरू राहणार आहे. उमेदावारांना अर्ज करण्यासाठी गृह विभागाने policerecruitment2025.mahait.org हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.















Discussion about this post