पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. राज्यात ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.
सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे.
पोलिस भरती कशी होते?
पोलिस भरतीसाठी उंची, छाती आणि धावणे या गोष्टी तपासल्या जातात.
१. शारीरिक चाचणी
उंची, चाचणी आणि धावणे यांसारख्या गोष्टींची शारीरिक तपासणी केली जाते.
२. लेखी परीक्षा
यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा १०० गुणांची असते.
३. मुलाखत
तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
४. कागदपत्रे पडताळणी
यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळमी केली जाणार आहे.
५. वैद्यकीय तपासणी
यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उमेदवारांची पोलिस दलात नियुक्ती केली जाते.















Discussion about this post