मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहित समोर येत आहे.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अपडेट समोर येताच भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
दरम्यानं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असून शनिवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली.
या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीबाबत महायुतीची रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
त्यामुळे तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या गटातील आमदारांना संधी मिळणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
Discussion about this post