भोपाळ । मध्यप्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठीची मतमोजणी सुरू असून पहिला कल हाती आला आहे. यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने पहिल्या कलात 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने अवघ्या 93 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी दोन जागांवर आघाडी घेतली आहे.
पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे स्वप्न भंगलं आहे. राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यांपैकी मध्य प्रदेशात काँग्रेसची हवा असल्याचं सांगितलं जात होतं. पण निकाल भलताच लागला आहे. सकाळी १० च्या सुमारास आलेल्या कलानुसार भाजप आघाडीवर आहे. भाजपसाठी हा मोठा दिलासा आहे.
राज्यात बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात भाजपने 133 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेस 93 जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी दोन जागांवर आघाडी घेतली आहे.
Discussion about this post