जळगाव : जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. नाशिक आयजींच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 10 लाखांचा गुटखा जप्त केल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. भगवान साहेबराव पाटील (रा.आव्हाणे, ता.धरणगाव) असे अटकेतील गुटखा मालकाचे नाव आहे.आरोग्यास अपायकारक अन्न पदार्थ असलेला रजनीगंधा पान मसाला, आरएमडी पान मसाला, राजनिवास पानमसाला, विमल पान मसाला, व्हिवन तंबाखू, जाफरानी जर्दा व एम.सेंटेड तंबाखू साठा गुरुदेव नगर परीसरातील रॉयल इनफील्ड शोरूम पाठीमागच्या एका गोदामातून जप्त करण्यात आला.
नाशिक आयजींच्या विशेष पथकाने ही कारवाई शुक्रवार, 10 रोजी 4.50 वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी रवी पाडवी यांच्या फिर्यादीवरून भगवान साहेबराव पाटील (30, आव्हाणे, ता.धरणगाव) व अरुण पाटील (जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोदामातून नऊ लाख 91 हजार 600 रुपये किंमतीचा गुटखा, 23 हजारांची रोकड व दोन वाहने मिळून 19 लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहेत.















Discussion about this post