महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली असून आतापर्यंत पात्र महिलांना ५ महिन्याचे हप्ते देण्यात आले आहेत. त्यातील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते अॅडव्हान्समध्ये देण्यात आले आहेत. दरम्यान, आता पुढचा हप्ता येणार नसल्याच्या चर्चा होत आहेत.सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक योजनांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगने दिल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडून थांबवण्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता महिलांना डिसेंबर महिन्यात पैसे मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांना थेट डिसेंबर महिन्यात मिळू शकतो. लाडकी बहीण योजनेला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना निधी वाटप केला जातो. ज्या योजनांमधून मतदारांवर प्रभाव पडतो. त्या योजना त्वरित थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना निवडणुक आयोगाने दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. या योजनेत सध्या निधीचे वितरण थांबवण्यास सांगितले आहे. त्यामुळे योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.















Discussion about this post