मुंबई । राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. आतापर्यंत डिसेंबरपर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता लाडकी बहिणींना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा आहे.यातच या योजनेत महिलांना आता लवकरच २१०० रुपये दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. तर आता जानेवारी महिन्याला महिलांना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याबाबत संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.
लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर २१०० रुपये दिले जातील, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच २१०० रुपये मिळतील, असं महिलांना वाटत होतं. मात्र, अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना १५०० रुपये देण्यात आले होते.
दरम्यान, आता महिलांना २१०० रुपये मिळणार का याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना जानेवारी महिन्यात १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महिलांना या महिन्यातदेखील १५०० रुपये मिळणार आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे महिलांना या महिन्यातदेखील १५०० रुपये मिळणार आहे.
Discussion about this post