धुळे । महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अंतर्गत अनेक गरीब व गरजू महिलांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते, परंतु काही अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने सरकारने त्यांच्या खात्यातील रक्कम परत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे आता ज्या बहीणी योजनेच्या निकषात बसत नाही त्यांचा लाड सरकार करणार नसल्याचं दिसत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. त्यानुसार ही पडताळणी सुरूही झाली त्याच दरम्यान आता धुळ्यातील एक महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे 7500 रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आत्तापर्यंत देण्यात आलेले 5 महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकारजमा करण्यात आले.















Discussion about this post