कच्छ । गुजरातमधील कच्छ जिल्हा भूकंपाने हादरला असून आज पहाटे साडेचार वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेकांनी घराच्या बाहेर पळ काढला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी म्हणजेच, एनसीएस यांच्यानुसार कच्छमधील या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता मध्यम असल्याची नोंद करण्यात आली. पण पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक होते.
एनसीएसनुसार, भूकंपाचा केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त १० किलोमीटर खाली होता. उथळ खोलीवर होणारे भूकंप सहसा अधिक तीव्रतेने जाणवतात. पण कच्छमध्ये भूकंपाचा फारसा परिणाम जाणवला नाही.गुजरातच्या कच्छमध्ये झालेल्या भूकंपामध्ये कोणतीही जिवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची अधिकृत्त वृत्त आलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांकडून कच्छमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.















Discussion about this post