सोशल मीडयावर देखील काळजाला धडकी भरवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक विषारी कोब्रा साप पैसे आणि दागिन्यांनी भरलेल्या तिजोरी शिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.आता लोक विचार करत आहेत की, ही नाग तिजोरीत शिरला कसा? कारण तिजोरी ही बंदच असते.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये, हा साप उघड्या तिजोरीत गुंडाळलेला दिसतो. तिजोरी ५०० रुपयांच्या नोटा आणि सोन्याचे हार दिसून येत आहे. साप त्यावर फणा काढून घिरट्या घालताना दिसत आहे. हे दृश्य इतके भयानक आहे की आत त्या ठिकाणी कोणीही जाण्याचा प्रयत्न करत नाही आहे. नाग हल्ला करताना दिसत आहे.
हमेशा सिर्फ सुना था आज देख भी लिया। 🧐
पुराने लोगों से दादा और दादी से सुनता चला आ रहा हुँ,की पहले जहाँ भी जमीन मे धन गड़ा होता था, उसकी रक्षा सर्प करते थे।
लेकिन ये लोहे की अलमारी, तीजोरी मे कैसे पहुँच गया, यहाँ का पता किसने दिया इसको। pic.twitter.com/UVcnWPcK3x
— Abhishek Agrahari (@abhishek902444) September 25, 2025
सोशल मिडिया एक्स @abhishek902444 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘मी नेहमीच याबद्दल ऐकले होते, पण आज मी ते पाहिले. मी जुन्या लोकांकडून, माझ्या आजी- आजोबांकडून ऐकत आले आहे. पूर्वी जिथे खजिना पुरला जायचा तिथे तो सापांनी सुरक्षित केला होता. पण हा साप लोखंडी कपाटात किंवा तिजोरीत नेमका कसा गेला? असा प्रश्न आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ३ लांखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने, ‘नागराज एक प्रतिभाशाली आहे भाऊ.’ हा एक अतिशय धोकादायक व्हिडीओ आहे. साप तिजोरीत कसा घुसू शकतो? असं देखील त्यानं म्हंटल आहे.














Discussion about this post