मुंबई । उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आनंदाची बातमी असून मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने घोषणा केली आहे. मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या 8 दिवस आधी केरळच्या किनाऱ्यावर दाखल झाला. या वर्षी मान्सून गेल्या १६ वर्षांच्या तुलनेत लवकर दाखल झाला आहे. त्यामुळे केरळसह देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सून आज शनिवारी दाखल झाल्याची माहिती मिळाली. भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज खरा ठरलाय. यापूर्वी मान्सून केरळात 2009 साली 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आता १६ वर्षांनी मान्सून लवकर केरळात दाखल झाला आहे. मान्सून गोव्याच्या वेशीवर पोहोचला आहे. त्यामुळे मान्सून 31 मेपर्यंत महाराष्ट्रात धडक देण्याचा अंदाज आहे.
Update on southwest Monsoon Advance today, the 24th May 2025 over India
❖The Southwest Monsoon has further advanced into remaining parts of south Arabian Sea, some parts of westcentral & eastcentral Arabian Sea, entire Lakshadweep area, Kerala, Mahe, some parts of Karnataka,… pic.twitter.com/4VsTjrSRw9
— India Meteorological Department (@Indiametdept) May 24, 2025
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार वळवाचा पाऊस सुरु आहे. मान्सून आठवडाभर लवकरच येण्याचा अंदाज खरा ठरलाय. मान्सूनसाठी अनुकुल परिस्थिती बनल्याने रेंगाळण्याची सूतराम शक्यता नाही. यामुळे बळीराजानेही लगबग सुरु केली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात पोहोचण्याची मोठी शक्यता आहे. यंदा मान्सूनने १६ वर्षांपूर्वीचा योग साधला आहे.
Discussion about this post