जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी एसटी महामंडळाने बस सेवा सुरू करावी याबाबत विभाग नियंत्रक यांना दोन दिवसापूर्वी निवेदन दिले होते.त्याची दखल घेत महामंडळाने बस सुरू केली आहे.
एस टी महामंडळ प्रशासनाने याची दखल घेत जुने बस स्टॅन्ड येथून आज पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याकरता विद्यार्थ्यांच्या टाईम टेबल नुसार बस सेवा सुरू केली.
तातडीने बस सेवा सुरू केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एसटी प्रशासनाचे आभार मानले असून दुपारी दोन वाजता फटाक्यांच्या जल्लोषात बस सेवेचे स्वागत केले.
जळगावचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील व जुने स्टॅन्ड येथील वाहतूक नियंत्रक रवींद्र पाटील बस चालक रमेश बडगुजर व महामंडळाचे कर्मचारी वर्ग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपशहर अध्यक्ष सतीश सैदाने, चेतन पवार, शहर सचिव जितेंद्र पाटील, संदीप मांडोळे, विजय कापडणे, ऐश्वर्य श्रीरामे, प्रदीप पाटील, दर्शन पाटील, सुरज कुमावत राहुल साळुंखे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
Discussion about this post