जळगाव । जळगाव शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस झालेला नाहीय. जळगावसह राज्यात परतीचा पाऊस परतल्यामुळे ऑक्टोबर हिटचा अनुभव आहे. शहरात ऑक्टोबर हिटचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तापमान वाढल्यामुळे जळगावकर घामघूम होत आहे. पुणे आणि राज्यात ऑक्टोबर हिट आणखी वाढणार आहे.
राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परत गेला असून आता उर्वरित एक दोन दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस जाणार आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागातून मान्सून परत जाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. जळगाव शहरातील तापमान ऑक्टोबर हिटमुळे वाढले आहे. आता ३६ अंशावर पोहचले आहे
येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, जिल्ह्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. यामुळे दुपारी ऑक्टोंबर हिटचे चटके जाणवणार असून सध्याकाळनंतर तापमान सामान्य होणार आहे. तसेच पहाटेच्या सत्रात गारवा जाणवेल,
Discussion about this post