जळगाव शहरातील एमआयडीसी भागात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एक भीषण आग लागली, ज्यामुळे मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग लागल्याने खळबळ उडाली असून अग्निशामक दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या मानराज सुझुकी शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान आगीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाची तारांबळ सुरू आहे. सदर घटनेत कीती नुकसान झाले आहे ९ वाजेपर्यंत कळले नव्हते शोरुमचे कर्मचारी दाखल झाले आहे.















Discussion about this post