जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच आणखी एका लाचेची बातमी समोर आलीय. आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्क सोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याचे काम नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून करून आणून देतो, असे सांगून १५ हजारांची लाच मागून काम सुरू करण्यास १ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भूमापन कार्यालयातील खासगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावाने असलेला प्लॉटला वारस लावण्यासह इतर नातेवाइकांचे हक्क सोडणे व कर्जाचा बोला उतरवण्याच्या कामासाठी भूमापन कार्यालयातील खासगी पेंटर अविनाश सदाशिव सनांसेने १५ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच कामाची सुरुवात करण्यासाठी १५०० रुपये मागितले.
तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला १ हजार रुपये देताच पथकाने अविनाश सनंसे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोकॉ राकेश दुसाणे, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.
Discussion about this post