जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचं दिसत असून अशातच आता वीज कंपनीच्या वायरमनवर अँटी करप्शन ब्युरोने एक लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याबाबत असे की, जळगावातील 30 वर्षीय तक्रारदाराकडील पाच वीज मीटर 2 डिसेंबर 2024 रोजी भरारी पथकाने काढून नेले होते. तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे तुमच्यावर जर वीज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर दिड लाख रुपये लाच द्यावी लागेल, असे तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराने 3 डिसेंबर रोजी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली.
त्यानंतर लाच पडतळणीत आरोपींनी दिड लाख रुपये लाच मागून एक लाखात तडजोड करण्याचे मान्य केले. पोलिसांनी रचलेलल्या सापळ्याचा संशय आल्याने संशयित आरोपीने रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच मागणीचा अहवाल येताच मंगळवारी सायंकाळी शनिपेठ पोलीस स्टेशनला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वायरमनावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Discussion about this post