जळगाव । जळगाव शहरालगतच्या खेडी येथील आंबेडकरनगरात पार्टिशनच्या घरांना आग लागली. यात सहा घरे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. मनपाच्या तीन अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आग शॉर्ट सर्किटने लागली की फटाक्याच्या ठिणगीने याबाबत संभ्रम आहे. खेडी येथील आंबेडकरनगरात मंगळवारी भोई कुटुंबीय राहत असलेल्या घरातून धूर निघू लागला. पाहतापाहता आगीने मोठे रूप धारण करून घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलीत. त्यात सहाही कुटुंबांचे संसार जळून खाक झाले. यात कीर्ती भोई, सुमन रामा भोई, प्रदीप भोई, विकी , सागर ठाकूर व आधार चौधरी यांची घरे त्यातील गृहोपयोगी साहित्य जळाले. आगीची माहिती आशिष शर्मा यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाला कळवली. फायर ब्रिगेडचे चालक देविदास सुरवाडे, संजय भोईट, निवांत इंगळे, रोहिदास चौधरी, महेश पाटील, सरदार पाटील आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.















Discussion about this post