सोलापूर । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींच्या प्रचार सभांचा धुरळा उडालाय. मात्र यातच उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात भाजपला जोरदार धक्का दिलाय.
भाजपच्या माजी आमदाराने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार बिराजदार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. सोलापूर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षप्रवेश झाला. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. ऐन विधानसभेला शिवशरण बिराजदार पाटील यांनी साथ सोडल्याचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
शिवशरण पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच भाजपवर टीका केली. त्याशिवाय मी माझ्या घरी परत आले याचा मला खूप आनंद होत आहे, असे वक्तव्यही केलेय. माझी वाट चुकली होती, असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला. शिवशरण पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला















Discussion about this post