जळगाव | डोनाल्ड्र ट्र्म्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दराला झळाळी आहे. सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली आहे जळगाव सराफा बाजारात दोन्ही धातु वधारले आहेत.
एकाच दिवासात जळगावच्या सराफ बाजारात एकाच दिवसात १२०० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात सुद्धा एक हजार रूपयांची वाढ झाली यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह ८९ हजार ५०७ रुपयांवर पोहचले.
चांदीही एक हजार रुपये महागली असून ९७,००० रुपये किलो झाली आहे. सोन्याचे दर पुन्हा 90 हजारांच्या तर चांदी 1 लाखांचे उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
Discussion about this post